पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील ४५ वर्षांपुढील लाभार्थींना ‘कोविशिल्ड’ लसीचा पहिला आणि दुसरा डोस उद्या (रविवारी दि.१६) रोजी देण्यात येणार आहे. ८ केंद्रांवर हे लसीकरण होणार आहे. पहिला आणि दुसरा डोससाठीची लाभार्थी क्षमता १००-१०० असणार आहे.

शासनाने दिलेल्या निर्देशानुसार उद्या महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थींचे लसीकरण करण्यात येणार नाही. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ज्या नागरिकांनी पुर्वी ‘कोविशिल्ड’ या लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यांना १५ मे २०२१ पासून ‘कोविशिल्ड’ या लसीचा दुसरा डोस हा १२ ते १६ आठवड्यांच्या दरम्यान (८४ ते ११२ दिवस) देण्यात येणार आहे.
त्या अनुषंगाने उद्या रविवारी फक्त ४५ पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थींना ‘कोविशिल्ड’चा पहिला व दुसरा डोस आठ लसीकरण केंद्रावर सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत देण्यात येईल.
१) यमुनानगर रुग्णालय, २) तालेरा रुग्णालय, ३) सावित्रीबाई फुले शाळा भोसरी, ४) नवीन जिजामाता रुग्णालय, ५) आचार्य आत्रे सभागृह वायसीएम रुग्णालय जवळ, ६) खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव, ७) नवीन आकुर्डी रुग्णालय, ८) आहिल्यादेवी होळकर स्कुल सांगवी रुग्णालय जवळ.
१८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थ्यांनी महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये. महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन वैद्यकीय विभागाने केले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका लसीकरण केंद्रावर आज १४२९ लाभार्थींना लसीकरण करण्यात आले आहे.






















Join Our Whatsapp Group