पिंपरी (Pclive7.com):- शिवसेना भोसरी विधानसभा प्रमुख माजी नगरसेवक धनंजय आल्हाट यांचे युवा फाउंडेशन मित्र परिवार व समस्त ग्रामस्थ मोशी यांच्या माध्यमातून दररोज सुमारे ५०० हून अधिक गरजू लोकांची जेवणाची सोय भागविण्यासाठी “नागेश्वर महाराज अन्नछत्र” अभियानाचा आज मोशीमध्ये शुभापूजा माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
या योजनेतून हातावर पोट भरणारे गोरगरीब, कष्टकरी लोकांना जेवणाची थाळी मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच ज्यांना कोरोना झाला आहे व जे लोक होम क्वारंनटाईन आहेत, अशांच्या घरी सद्यस्थितीत जेवणाची सोय नसल्याने त्या कुटुंबांना देखील मोफत घरपोच डबा पुरवण्यात येणार आहे. या बहुमूल्य सेवेबद्दल धनंजय आल्हाट, त्यांचे सर्व सहकारी व मोशीकरांचे अभिनंदन व्यक्त करण्यात आले.
यावेळी झालेल्या शुभारंभप्रसंगी शिवसेना कामगार नेते इरफानभाई सय्यद, शिवसेना भोसरी विधानसभा प्रमुख व माजी नगरसेवक धनंजय आल्हाट, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके, माजी नगरसेवक बबनराव बोराटे, मार्तंड देवस्थान विश्वस्त तुषार सहाणे, सचिन सानप, राहुल भोसले, अरूण गिरी, सुदाम आल्हाट, अरूण बो-हाडे, दिलीप बो-हाडे, कविता आल्हाट, सोपान बोराटे, गुलाब आल्हाट, राजेश सस्ते, नितीन सस्ते, उदय तापकीर, दिपक सस्ते, हिरामण सस्ते, परमेश्वर आल्हाट, परशूराम आल्हाट, संतोष बोराटे ,गणेश बोराटे अनिल बनकर, शांताराम बोराटे, संजय लडकत, प्रकाश गव्हाणे, दत्तात्रय मोकाशी, अमृत आल्हाट आदी मान्यवर उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group