पिंपरी Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेला सलग द आजही कोरोना प्रतिबंध लस मिळाली नाही. शासनाकडून लससाठा उपलब्ध न झाल्याने पिंपरी चिंचवड शहरातील लसीकरण केंद्रे उद्या (दि.१८) बंद राहणार आहेत.
०१ मे पासून १८ वर्षांपुढील सर्वांचे लसीकरण सुरू करण्यात आले होते. परंतु, लसीची उपलब्धता कमी झाल्याने दुस-या डोसचा कालावधी पूर्ण झालेल्या नागरिकांना लस मिळत नव्हती. अनेकांना लसीअभावी परत जावे लागत होते. त्यामुळे १८ वर्षांपुढील लसीकरण लांबविले. १८ वर्षांपुढील कोणालाही लस दिली जात नव्हती. केवळ ४५ वर्षांपुढील नागरिकांना दुसरा आणि पहिला डोस दिला जात होता.
परंतु, दोन दिवसांपासून लस उपलब्ध झाली नाही. आजही लस उपलब्ध झाली नाही. त्यामुळे उद्याही लसीकरण बंद आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेस शासनाकडून लस साठा उपलब्ध न झाल्यामुळे उद्या मंगळवारी कोणत्याही वयोगटातील नागरीकांचे लसीकरण करण्यात येणार नाही, याची नागरीकांनी नोंद घ्यावी. लसीकरण केंद्र बंद असल्याने लसीकरण केंद्राच्या परिसरामध्ये नागरीकांनी गर्दी करु नये, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.






















Join Our Whatsapp Group