तळेगाव (Pclive7.com):- पोलीस फ्रेन्ड्स वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य मावळ तालुका यांच्या वतीने तळेगांव पोलीस स्टेशन येथे विशेष पोलीस अधिकारी यांना टी शर्टचे वाटप करण्यात आले.
तळेगांव पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, प्रशांत वाबळे, संस्थापक अध्यक्ष गजानन चिंचवडे, शुभम चिंचवडे, पुणे जिल्हा अध्यक्ष (ग्रामीण) प्रविण मुऱ्हे, मावळ तालुका महिला अध्यक्षा रुपाली दाभाडे, मावळ तालुका अध्यक्ष अतुल भेगडे, तळेगाव शहराध्यक्ष सोमनाथ त्रिंबके यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
तसेच लोणावळा शहर अध्यक्ष संजय मांढरे, चाकण शहर अध्यक्ष संजय पुरी, ऋषिकेश मुरकुटे, योगेश डंबे, अभिषेक मुरकुटे, विशेष पोलीस अधिकारी निलेश गराडे, शंकर जंगम, गणेश निसाळ, गणेश ढोरे आदि उपस्थित होते.
यावेळी तळेगांव पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव साहेब यांनी पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशन पोलीसांसाठी करत असलेल्या कार्याबद्दल कौतुक केले.
मनोगत महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष गजानन चिंचवडे, मावळ तालुका महिला अध्यक्षा रुपाली दाभाडे यांनी व्यक्त केले. व आभार पुणे जिल्हा (ग्रामीण) अध्यक्ष प्रविण मुऱ्हे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देहूरोड शहराध्यक्ष लक्ष्मण शेलार यांनी केले.






















Join Our Whatsapp Group