पिंपरी (Pclive7.com):- नाशिक फाटा, कासारवाडी येथील फुगे कॉम्प्लेक्सच्या टेरेसवर हॉटेल निसर्ग येथे सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने कारवाई केली. यात २१ हजारांचा ऐवज जप्त करत ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (दि.१७) रात्री करण्यात आली.
हॉटेल चालक गणेश नामदेव गोडसे (वय ३१, रा. भोसरी गावठाण), केतन सुखदेव वाघचौरे (वय २९, रा. सांगवी), शिवम शांताराम खोसे (वय २२, रा. मोशी), राहुल भिमराव लोखंडे (वय २८, रा. थेरगाव), महेश राजेश निकम (वय २३, रा. पिंपरी), नितीन हिरामण गोडसे (वय ४५, रा. लांडेवाडी, भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत सामाजिक सुरक्षा पथकाचे पोलीस कर्मचारी अनिल महाजन यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश गोडसे याने त्याच्या हॉटेलमध्ये अवैधरित्या हुक्का पिण्यासाठी ग्राहकांना एकत्र जमवले. हुक्का पिण्यासाठी लागणारे साहित्य देखील आरोपी गणेश गोडसे याने पुरवले.
हॉटेल निसर्ग हे हॉटेल नितीन गोडसे याचे असून ते चालवण्यासाठी त्याने गणेश गोडसे याला दिले आहे. अन्य आरोपी हॉटेलमध्ये हुक्का पिताना आढळले आहेत. आरोपींच्या ताब्यातून २१ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.






















Join Our Whatsapp Group