पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेला दोन दिवसांनंतर कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस उपलब्ध झाले आहेत. ४५ वर्षांपुढील २८ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस १६ केंद्रांवर उद्या (बुधवार दि.१९) देण्यात येणार आहे. एका केंद्रांवर १५० जणांना डोस दिले जाणार आहेत. तर, ‘कोविशिल्ड’चा पहिला व दुसरा डोस ४५ वर्षांपुढील नागरिकांना ५० केंद्रावर देण्यात येणार आहे.

शासनाकडून महापालिकेला आज कोविशिल्डचे ५ हजार आणि कोव्हॅक्सिनचे २ हजार डोस उपलब्ध झाले आहेत. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार उद्या महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थींचे लसीकरण करण्यात येणार नाही. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ज्या नागरिकांनी पुर्वी ‘कोविशिल्ड’ या लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यांना १५ मे २०२१ पासून ‘कोविशिल्ड’ या लसीचा दुसरा डोस हा १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान (८४ ते ११२ दिवस) देण्यात येणार आहे.

‘कोव्हॅक्सिन’चा फक्त दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने उद्या बुधवारी ४५ वर्षांपुढील नागरिकांना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस १६ केंद्रावर दिला जाणार आहे. सकाळी १० ते ५ या वेळेत लसीकरण होणार आहे. एका केंद्रांवर १५० जणांचे लसीकरण होणार आहे.

‘या’ केंद्रावर मिळणार ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस
यमुनानगर रुग्णालय, प्राथमिक शाळा – ९२ मोरेवस्ती, तालेरा रुग्णालय, प्रेमलोक पार्क दवाखाना, सावित्रीबाई फुले शाळा भोसरी, नवीन भोसरी रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळेसौदागर, आचार्य अत्रे सभागृह संत तुकारामनगर पिंपरी, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव, पिंपळेनिलख इंगोले महापालिका शाळा, नवीन आकुर्डी रुग्णालय, इ.एस.आय.एस हॉस्पिटल मोहननगर चिंचवड, पिंपळेगुरव माध्यमिक शाळा, कासारवाडी दवाखाना.
त्याचबरोबर ४५ वर्षांपुढील नागरिकांना उद्या कोविशिल्डचा पहिला व दुसरा डोस महापालिकेच्या आकुर्डी, यमुनानगर, वायसीएमएच, भोसरी, सांगवी, थेरगाव, जिजामाता, तालेरा रुग्णालयातील ५० केंद्रांवर देण्यात येणार आहे. दुसरा डोस १२ ते १६ आठवडे पूर्ण झालेल्यांनाच दिला जाणार आहे. १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे.






















Join Our Whatsapp Group