पुणे (Pclive7.com):- महाराष्ट्रात कोल्हापूर, साताऱ्यामधील काही भागांमध्ये सकाळी ९.१६ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती एएनआयनं दिली आहे. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.३ इतकी नोंदवण्यात आली आहे. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आलं आहे.
यासोबतच हे धक्के सातारा परिसरात देखील जाणवल्याची माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, यामध्ये अद्याप कोणतीही जीवित तसेच वित्तहानी झाली नसल्याची माहिती मिळत असून अधित तपशील प्रतिक्षेत आहे.






















Join Our Whatsapp Group