पिंपरी (Pclive7.com):- काही दिवसापुर्वी नगरसेवक शत्रुघ्न (बापु) काटे यांनी मान्सून सुरु होण्याआधी स्वराज गार्डन चौक झिंजुर्डे मळा येथील स्ट्रॉम वॉटर लाईनचे काम लवकरात लवकर सुरु करण्यासंदर्भात संबंधित अधिकारी यांच्या सोबत पाहणी केली होती. परंतु झिंजुर्डे मळा लगत असणाऱ्या संरक्षण हद्दीतील परवानगी मिळेपर्यंत या कामाला सुरूवात करण्यास येत नसल्यामुळे हे काम लांबणीवर होते.
बरेच वर्षांपासून झिंजुर्डे मळा येथील नागरिकांना पावसाच्या साचलेल्या पाण्याला सामोरे जाण्यास भाग पडत होते. स्ट्रॉम वॉटर लाईनचा प्रश्न कायम स्वरूपी मार्गी लावण्यासाठी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी महानगरपालिका अधिकारी आणि संरक्षण खात्यातील अधिकाऱ्यांशी संगणमताने सकारात्मक चर्चा करून अखेर संरक्षण खात्याने या कामास परवानगी दिली असून येत्या दोन दिवसात स्ट्रॉम वॉटर लाईन च्या कामास सुरुवात करण्यात येणार आहे.






















Join Our Whatsapp Group