पिंपरी (Pclive7.com):- पोलिस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशन (महाराष्ट्र राज्य)- मावळ विभागच्या वतीने वडगांव व तळेगाव मावळ येथील पोलीस बांधवाना छत्री वाटप कार्यक्रम घेण्यात आला.
पोलिस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशन (महाराष्ट्र राज्य) चे संस्थापक अध्यक्ष गजाननभाऊ चिंचवडे यांच्या मार्गदर्शनाने तसेच पोलिस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशन वडगांव मावळचे अध्यक्ष मंगेश खैरे यांच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सध्या पावसाळा ऋतू सुरु झाला आहे. आपले कर्तव्य बजावत असताना ऊन, पाऊस यापासून आपल्या पोलीस बांधवाचे संरक्षण व्हावे यासाठी त्यांना छत्री वाटप करण्यात आले, असे आपल्या प्रास्ताविक मध्ये वडगांव मावळचे अध्यक्ष मंगेश खैरे यांनी मांडले. वडगांव व तळेगाव मावळ येथील पोलीस स्टेशनच्या सर्व पदाधिकारी यांना एकूण ८४ लहान छत्र्या व तीन मोठ्या आकाराच्या छत्र्या देण्यात आल्या. वडगांव मावळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक निंबाळकर साहेब, पोलीस सब इन्स्पेक्टर चामे साहेब, मनोज कदम साहेब, वडोदे साहेब, काळे साहेब, माने साहेब, ननावरे साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.
तळेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भास्करराव जाधव, पोलिस निरीक्षक शहाजी पवार साहेब यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. उपस्थित सर्वांचे आभार पोलिस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष गजाननभाऊ चिंचवडे यांनी तसेच पुणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष प्रवीण मुऱ्हे यांनी मानले.
कार्यक्रमासाठी पोलिस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्यचे सहसचिव भालचंद्र बांगर, मावळचे अध्यक्ष अतुल भेगडे, देहूरोड शहर अध्यक्ष लक्ष्मण शेलार, तळेगाव शहर अध्यक्ष बजरंग रंधवे, कामशेत शहर युवक अध्यक्ष चेतन वाघमारे यांचे योगदान लाभले. तसेच सभासद अभिषेक मुरकुटे, रवींद्र म्हाळसकर, ऋषिकेश मुरकुटे, शैलेश वहिले, महेश सुतार, आशिष भालेराव, किरण ओव्हाळ, संदीप नवघने, अनिकेत ढमाले, ओम सूर्यवंशी, किरण ढोरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देहूरोड शहर अध्यक्ष लक्ष्मण शेलार यांनी केले.






















Join Our Whatsapp Group