पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष आणि युवा नेते यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘सेवा सप्ताह’चे आयोजन करण्यात आले आहे. त्यामाध्यमातून 28 जून ते 1 जुलै या कालावधीत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर वाढदिवसाचा कोणताही डामडौल न करता सामाजिक जबाबदारीचे भान राखून सचिन काळे सोशल फाऊंडेशन आणि मित्र परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्याअंतर्गत काळेवाडी येथील ज्योतिबा उद्यानात सकाळी वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. तर दुपारी 12 वाजता पवनानगर येथील महानगरपालिकेच्या शाळेत रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबिरामध्ये सहभागी होत परिसरातील युवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. यावेळी फाउंडेशनच्या वतीने प्रत्येक रक्तदात्याला वाफेची मशीन मोफत देण्यात आली.
याप्रसंगी माजी विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक नाना काटे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष अॅड. संदीप चिंचवडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर, माजी नगरसेवक कैलास थोपटे, विजय काळे, प्रशांत सपकाळ, प्रमोद ताम्हणकर, दिलीप काळे आदी मान्यवर तसेच नागरिक व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
सचिन काळे सोशल फाऊंडेशनच्या वतीने वाढदिवसानिमित्त 29 जून रोजी ऑक्सिजन दिंडी काढण्यात आली. त्याअंतर्गत काळेवाडी प्रभागातील कुटुंबांना झाडांच्या रोपांचे वाटप करण्यात आले. 30 जून रोजी चिंचवड येथील अनाथआश्रमातील चिमुकल्यांना खाऊ वाटप करण्यात येणार आहे.
तसेच काळेवाडीतील आदर्शनगरमध्ये महिला बचत गटांच्या स्थापनाही करण्यात येणार आहेत. 1 जुलै रोजी गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप केले जाणार आहे. त्यासाठी गरजू विद्यार्थ्यांनी 9011555600 व 9923508320 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सचिन काळे यांनी केले आहे.