पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्वत्र लसीकरण मोहिम सुरू आहे. मात्र लसींचा तुटवडा आणि ऑनलाईन नोंदणी करण्याची पध्दत यामुळे सामान्य नागरिकांना लस मिळवणे अवघड झाले आहे. म्हणूनच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सौजन्याने आणि क्रांती फाऊंडेशनच्या पुढाकाराने गणेश लंगोटे यांनी चिंचवड स्टेशन परिसरातील २०० सामान्य नागरिकांना लस उपलब्ध करून दिली.
कोरोना महामारीच्या काळात सर्वत्र लसीकरण केले जात आहे. परंतु समाजातील काही घटक जसे कि भाजीविक्रेते, कामगार वर्ग, मजूर, कामगार, हॉटेल्स मधील स्टाफ, रिक्षाचालक, पथारीवाले, किराणा दुकानदार ज्यांना याबद्दल जास्त माहिती नाही. तसेच कोरोना लसीकरणाची प्रक्रिया हि ऑनलाइन असल्यामुळे अनेक लोकांना याचा लाभ घेता येत नाही.
हे सर्व समाजातील घटक असे आहेत कि यांचा दररोजच्या जीवनात सर्व छोट्या-मोठ्या वर्गातील लोकांशी संबंध येतो. या सर्वांचे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सौजन्याने व क्रांती फाऊंडेशनच्या पुढाकाराने मरहुम फकीरभाई पानसरे उर्दू शाळा चिंचवड स्टेशन येथे लसीकरण करून घेण्यात आले. यात सुमारे २०० लोकांनी लाभ घेतला असल्याची माहिती गणेश लंगोटे यांनी दिली.






















Join Our Whatsapp Group