पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेले “पे अँड पार्किंग” धोरण तात्काळ रद्द करून नागरिकांची लूट थांबविण्याची मागणी निगडी शिवसेनेचे शाखाप्रमुख अरुण जोगदंड यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे. हे धोरण रद्द न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
सध्याच्या कोरोना संकटकाळात नागरिकांचे जीव वाचविण्यापेक्षा नागरिकांना वेठीस धरून पैशाची वसुली करण्यासाठी महापालिका व सत्ताधारी चुकीची पावले उचलत आहेत. सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे नागरिकांची आर्थिक स्थिती खुप बिकट झाली आहे. लोकांचे कामे व उद्योगधंदे बंद पडले आहेत. लोकांचे आधीच महागाईने कंबरडे मोडलेले असताना अशा परिस्थितीत पिंपरी चिंचवड महानगरपालिका नागरीकांना वेठीस धरण्याचे काम करीत आहे.
“नागरीकांकडुन हुकुमशाही पद्धतीने पैसे लुटण्याचे काम सुरू असुन ते लवकरात लवकर बंद करा अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरून या हुकुमशाहीचा विरोध करेल” असा आक्रमक इशारा यावेळी देण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेले “पे अँड पार्किंग” हे दडपशाही धोरण तातडीने बंद करण्यात यावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेच्या अरुण जोगदंड यांनी आयुक्त व महापौरांना दिला आहे.






















Join Our Whatsapp Group