पिंपरी (Pclive7.com):- काळेवाडी येथील शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळ संचालित श्रीमती लक्ष्मीबाई तापकीर माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे.
मंगेश अशोक बेद्रे याने ९७ टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक मिळविला आहे. बजरंग विठ्ठल येलूरे याने ९०.८० टक्के गुण मिळवून शाळेत व्दितीय क्रमांक मिळविला आहे.
गणेश रामेश्वर कोटुळे याने ८८.६० टक्के गुण मिळवून शाळेत तृतीय क्रमांक मिळविला आहे. तर वैष्णवी संतोष पानसरे हिने ८८.४० टक्के गुण मिळवून शाळेत चतुर्थ क्रमांक मिळविला आहे.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मछिंद्र तापकीर, सचिव सागर तापकीर, मुख्याध्यापक शशिकांत वाखारे यांच्यावतीने सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले.