पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत चालला आहे. मात्र तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोरोनाचे निर्बंध पाळणे आवश्यक आहे. मात्र तरी देखील शहरातील नागरिकांना या भयानक परिस्थितीचे गांभिर्य नसल्याचे दिसून येत आहे. काल रविवारी (दि.२५ जुलै) रोजी दिवसभरात शहरात मास्क न लावता फिरणाऱ्या १५८ जणांवर पोलीसांनी कारवाई केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क न लावता फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. रविवारी (दि.२५ जुलै) रोजी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत मास्कच्या आदेशाचा भंग करणाऱ्या १५८ जणांवर पोलिसांनी कारवाई केली. त्यात सर्वाधिक चिंचवड, भोसरी एमआयडीसी आणि हिंजवडी परिसराचा समावेश आहे
नागरिकांनी मास्क वापरावा, असे आवाहन महापालिका आणि पोलिसांकडून केले जात आहे. मात्र, त्याचे उल्लंघन केले जात आहे.
मास्क न घालणाऱ्यांवर करण्यात आलेली कारवाई पुढीलप्रमाणे –
एमआयडीसी भोसरी (०५), भोसरी (११), पिंपरी (००), चिंचवड (१२), निगडी (००), आळंदी (०३), चाकण (०६), दिघी (०४), सांगवी (०३), वाकड (०५), हिंजवडी (१२), देहूरोड (४६), तळेगाव दाभाडे (३०), तळेगाव एमआयडीसी (०५), चिखली (१२), रावेत चौकी (०४), शिरगाव चौकी (००), म्हाळुंगे चौकी (००) एकूण (१५८)






















Join Our Whatsapp Group