पिंपरी (Pclive7.com):- लहुमुद्रा सोशल फाऊंडेशनच्या वतीने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयास १ हजार १०१ N-95 मास्क देण्यात आले. पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्याकडे हे मास्क सुपूर्त करण्यात आले.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त लहुमुद्रा सोशल फाऊंडेशनच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील पोलीस आयुक्त कार्यालयास N -95 मास्कचे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रबोधन पर्व २०२१ समारोप कार्यक्रम प्रसंगी देण्यात आले.
करोना काळात स्वतःच्या जीवाची बाजी लावून शहरातील जनतेच्या सेवेत पिंपरी चिंचवड शहरातील पोलीस कर्मचारी अहोरात्र कार्यरत आहेत. व कर्तव्य बजावत असताना करोना पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून लहुमुद्रा सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल रावसाहेब सौदडे यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०१ व्या जयंती निम्मित पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या कडे १ हजार १०१ N -95 मास्क सुपूर्त केले.
यावेळी लहुमुद्रा सोशल फाऊंडेशनचे पदाधिकारी सचिवमहेश खिलारे, कार्याध्यक्ष योगेश लोंढे, उपाध्यक्ष तानाजी साठे, बालाजी मोरे तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्व समितीचे अध्यक्ष संजय ससाणे, सचिव शिवाजी साळवे, मनोज तोडरमल, नितीन घोलप, ज्येष्ठ मार्गदर्शक भाऊसाहेब अडागळे, अरुण जोगदंड, गणेश साठे, डॉक्टर धनंजय भिसे, प्रसिद्धी प्रमुख किशोर हातागळे, भगवान शिंदे व इतर मान्यवर उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group