पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते तथा विद्यमान नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांचा वाढदिवस विविध समाज उपयोगी उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. तसेच प्रभागातील अनेक सोसायटी व शाळेमध्ये नाना काटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
भारतीय स्वातंत्र्य दिन आणि नाना काटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नगरसेविका सौ.शितलताई नाना काटे व रुबी अलकेअर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये 2D ECO, ECG, इत्यादी तपासण्या करण्यात आल्या. निदान झालेल्या रुग्णांची MPJAY योजने अंतर्गत मोफत अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी करण्यात येणार आहे.
तसेच पिंपळे सौदागर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात २५१ जणांनी रक्तदान केले. नगरसेविका सौ.शितलताई नाना काटे यांच्या वतीने प्रत्येक रक्तदात्याला एक भेटवस्तू देण्यात आली. त्यानंतर प्रभागातील महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना छत्रीचे वाटप करण्यात आले.
वाढदिवसानिमित्त नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांना शहरातील अध्यात्मिक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.
यामध्ये राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे, कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत भाऊ गावडे, विरोधी पक्षनेता राजू मिसाळ, शिवसेनेचे नगरसेवक राहुल कलाटे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेवक योगेश बहल, अजित गव्हाणे, मयूर कलाटे, संतोष कोकणे, विनोद नढे, पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, राजू बनसोडे, नगरसेविका उषामाई काळे, सायली रमेश वांजळे-शिंदे, रमाताई सनी ओव्हाळ, माजी नगरसेवक खंडूशेठ कोकणे, कैलासभाऊ थोपटे, सतिश दरेकर, प्रभाकर वाघेरे, मच्छिंद्र तापकीर, गणेश भोंडवे, राजेंद्र साळुंके, अरुण टाक,
राष्ट्रवादी युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, सरचिटणीस विशाल काळभोर, निरीक्षक पिंपरी भोसरी विधानसभा लाला चिंचवडे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष संदिप चिंचवडे, विद्यार्थी अध्यक्ष यश साने, सामाजिक न्याय विभाग विनोद कांबळे, शाम जगताप, शेखर काटे विनोद तापकीर, राज तापकीर, अतिश बारणे, शिवाजी पाडुळे, अमर आदियाल, तानाजी भोंडवे, धनाजी विनोदे, नरेशअप्पा खुळे, बाळासाहेब नढे,
हिंजवडीचे सरपंच सागर हुलावळे, हभप गंभीर महाराज, प्रभाकर ववले, विशाल काळे, भारत लिमण, प्रसाद लिमण, बांधकाम व्यावसायिक नरेशशेठ वाधवानी, विनोदशेठ चांदवाणी, योगेश मालपुरे, किरण शहा, लोटस हॉस्पिटलचे शिव अगरवाल, स्टर्लिंग हॉस्पिटलचे डॉ.विनायक शिंदे, आदि मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.





















Join Our Whatsapp Group