पिंपरी (Pclive7.com):- लाच प्रकरणात अटकेत असलेले पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांना आज (दि.२३) न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. तर, इतर चार कर्मचा-यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
वर्क ऑर्डर मिळविण्यासाठीच्या करारनाम्यावर सही करण्यासाठीचे १ लाख १८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना स्थायीच्या कर्मचा-यांना एसीबीने बुधवारी (दि.१८) महापालिका मुख्यालयात रंगेहाथ पकडले.
समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन ज्ञानेश्वर लांडगे, त्यांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे (मुख्य लिपिक), विजय शंभुलाल चावरिया, (पद लिपिक) , राजेंद्र जयवंतराव शिंदे (संगणक ऑपरेटर) आणि अरविंद भिमराव कांबळे, (पद शिपाई) यांना पोलिसांनी गुरुवारी (दि.१९) पहाटे अटक केली. त्यांना दोनवेळा दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.
आज कोठडीची मुदत संपल्याने पुन्हा न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने पाच जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली. लांडगे यांनी घरामध्ये कार्य असून त्याला उपस्थित राहण्याची परवानगी मागितली. न्यायालयाने २६ ऑगस्टपर्यंत त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला.





















Join Our Whatsapp Group