पिंपरी (Pclive7.com):- फुगेवाडी गावात घर कोसळून ढिगाऱ्या खाली १३ वर्षाची मुलगी पौर्णिमा मडके अडकली होती. ह्या मुलीस अग्निशमन दलाचे जवान, डॉक्टर व स्थानिक युवक, मयूर पुंडे यांनी तीन तास अथक परीश्रम करुन स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सुखरूप बाहेर काढले.
मयूर पुंडे यांनी आपली जीवाची बाजी लावून मुलीस वाचविले. त्यांनी दाखविलेल्या धाडसाबद्दल पिंपरी युवासेनेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
ह्यावेळेस शिवसेना उपविभाग प्रमुख एकनाथ हाके, पिंपरी युवासेनेचे युवाअधिकारी निलेश हाके, शिला मामी जाधव, स्वप्नील शेवाळे, अनिल साठे, राजू खलसे, अप्पा घुले, अभिजीत कांबळे, गणेश काटे, शिवा जमादार, सुरज थरकुडे, मयूर घुले, मंगेश कदम उपस्थित होते.























Join Our Whatsapp Group