पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आज झालेल्या ऑनलाईन स्थायी समितीच्या बैठकीत विविध विकास कामांसाठी येणा-या एकूण ४३ कोटी ९८ लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात आज स्थायी समितीची ऑनलाईन पध्दतीने सभा पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अॅड. नितीन लांडगे होते.
प्रभाग क्रमांक २३ मधील हेडगेवार पुल ते कुणाल रेसीडेन्सी पर्यंत जाणारा १२ मीटर रुंद रस्ता विकसीत करण्याकामी येणा-या ४४ लाख २० हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्रमांक २७ रहाटणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा उभारणे आणि अनुषंगीक कामे करण्याकामी येणा-या १ कोटी ९२ लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक आपत्तकालीन परिस्थिती व कोरोनाच्या अटकावासाठी साथरोगाची आपत्तीजनक स्थितीचा सामना करण्यासाठी किमान वेतन कायदयानुसार ३६ कामगार व २ सुपरवायझर यांचे तीन महिने कालावधीकरीता येणा-या २९ लाख ४७ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक आपत्तकालीन परिस्थिती व कोरोनाच्या अटकावासाठी साथरोगाची आपत्तीजनक स्थितीचा सामना करण्याकामी औषधे आणि साहित्यांची तातडीने आवश्यकता आहे. त्यांचे खरेदीकामी येणा-या ४५ लाख १ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता कै.अण्णासाहेब मगर स्टेडीयम येथील जंबो कोविड रुग्णालयातील १४० बेड आणि इतर बेड सुरु ठेवणेबाबत मुदतवाढ देण्यात आली असून त्याकामी येणा-या १ कोटी ४२ लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
टाटा मोटर्स रस्ता भोसरी ते थरमॅक्स चौक रस्ता सुशोभिकरण व मध्यदुभाजक उद्यान विषयक कामाची देखभाल करण्याकामी येणा-या १ कोटी २२ लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
क आणि ई क्षेत्रिय कार्यालयातील रस्ते मध्य दुभाजक सुशोभिकरण देखभाल करण्यासाठी येणा-या ७१ लाख ७७ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
वैद्यकीय विभागाचे वापराकरीता ब्लड मोबाईल कलेक्शन व्हॅनचे मनपा स्पेसीफिकेशनप्रमाणे चॅसी खरेदी करण्यासाठी येणा-या ३७ लाख १० हजार अधिक सेवाकर इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.






















Join Our Whatsapp Group