पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागरमधील नाना काटे सोशल फाऊंडेशन व श्री फाउंडेशनच्या वतीने ओम श्री साई मतिमंद अनाथ आश्रमातील मुलांना कपडे वाटप करण्यात आले.
यात १८ वर्षाखालील १५० मुला-मुलींना मनपसंतीनुसार काळेवाडी येथील वामन फॅशन क्लॉथ स्टोअर्स मधून कपडे, व दैनंदिन वापराच्या वस्तू, शालेय वस्तू खरेदी करून देण्यात आले.
यावेळी या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत असलेला दिसून येत होता. यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते श्री. विठठ्ल ऊर्फ नाना काटे, आश्रमाचे संस्थापक श्री.सागर पाडाळे आदी उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group