भोसरी (Pclive7.com):- भोसरीतील प्रभाग क्रमांक सहा मधील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्याचा जाब विचारण्यासाठी महावितरण विरोधात महा जन आंदोलन करण्यात येणार आहे. आपल्याला अंधारात ठेवणा-या महावितरणला दणका द्यायचा, हिसका दाखवायचा. त्यासाठी गुरुवारी (दि.१८) रोजी होणा-या मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन नगरसेवक रवी लांडगे, सामाजिक कार्यकर्त्या सोनाली उदावंत यांनी केले आहे.
भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे सभागृह येथून गुरुवारी सकाळी १० वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे. तेथून बालाजीनगर गवळी माथा येथील महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा धडकणार आहे. नगरसेवक रवी लांडगे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
वारंवार खंडित होणा-या विद्युत पुरवठ्याला जबाबदार कोण, प्रभागात वारंवार विज जाते. आम्ही वेळेवर बिले भरतो आणि आमचा हरिपाठ, काकडा चालू असतानाही विज जाते. याला जबाबदार कोण? दररोज सकाळी विज जाते.
त्याचा जाब विचारण्यासाठी येत्या गुरुवारी महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. आपणच आपल्या हक्कासाठी लढूयात, सर्वांनी गुरुवारी एमएसईबी विरोधात होणा-या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन नगरसेवक लांडगे यांनी केली आहे.