‘कॉंग्रेस चषक 2021’ चा प्रथम विजेता श्रीकांत देसाई युनायटेड संघ
पिंपरी (Pclive7.com):- युवकांच्या कलागुणांना कॉंग्रेस पक्षाने नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. स्व. पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कार्यकालात आणि युपीए एक आणि दोन सरकारमध्ये कॉंग्रेसने राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना राज्यसभेत सन्मानपूर्वक सदस्य केले. काँग्रेसची विचारधारा घरोघरी पोहचविण्याचे काम पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम करीत आहेत. आगामी महापालिका निवडणूकीत शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसचे उमेदवार तुल्यबळ लढत देतील असा विश्वास अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या सचिव आणि महाराष्ट्राच्या प्रभारी सोनल पटेल यांनी व्यक्त केला.

राष्ट्रीय कॉंग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने ‘कॉंग्रेस चषक 2021’ भव्य डे नाईट हाफ पिच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन संत तुकाराम नगर पिंपरी येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ सोनल पटेल आणि अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 30 डिसेंबर) संपन्न झाला.
यावेळी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम, कॉंग्रेसच्या प्रदेश सचिव संगिता तिवारी, माजी महापौर कविचंद भाट, युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, काँग्रेस सेवा दलाचे शहराध्यक्ष विरेंद्र गायकवाड, एनएसयुआयचे प्रदेश उपाध्यक्ष उमेश खंदारे, माजी नगरसेवक विश्वास गजरमल, सद्गुरु कदम, निर्मला कदम, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू दहितुले, दिनकर भालेकर, राजाराम भोंडवे, हरिश डोळस, गौतम ओव्हाळ, महिला नेत्या छायाताई देसले, नंदाताई तुळसे, स्वाती शिंदे, सायली नढे, अनिता अधिकारी, सुप्रिया पोहरे, अलका शिंदे, उषा साळवी, ज्येष्ठ नागरिक सेलचे माजी अध्यक्ष लक्ष्मण रुपनर, ज्ञानेश्वर मलशेट्टी, हिराचंद जाधव, सुनिल राऊत, के. हरी नारायणन, सौरभ शिंदे, आबा खराडे, विजय ओव्हाळ, गुंगा क्षिरसागर, पांडूरंग जगताप, विश्वनाथ जगताप, निखिल भोईर, किरण नढे, इस्माईल संगम, नयन पालांडे, रवी नांगरे, सुधाकर कुंभार, बाजीराव आल्हाट, सुप्रिया मलशेठ्ठी, अशोक कदम, तुळशीदास कदम, राजाभाऊ तांबे, पंकज पवार, संदिप शिंदे, मिलिंद बनसोडे, विवेक भाट, प्रविण मोरे, अजित यादव, वामन ऐनिले, सुनिल विटकर, हरिश घोसाळकर, लक्ष्मण तुळसे आदी उपस्थित होते.
अखिल भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने ‘कॉंग्रेस चषक 2021’ भव्य डे नाईट हाफ पिच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन संत तुकाराम नगर पिंपरी येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत पुरुष, महिला छोटा गट, मोठा गट एकूण 82 संघानी सहभाग घेतला होता.
अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या सचिव आणि महाराष्ट्राच्या प्रभारी सोनल पटेल यांच्या हस्ते प्रथम विजेत्या श्रीकांत देसाई युनायटेड संघास ‘कॉंग्रेस चषक 2021’ आणि अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे यांच्या हस्ते 44,444/- रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले. तसेच व्दितीय विजेता संघ भक्ती शक्ती मित्र मंडळ ‘कॉंग्रेस चषक 2021’ आणि 33,333/- रुपयांचा धनादेश, तृतीय विजेता राहुलभाऊ ताकभाते संघ यांना ‘कॉंग्रेस चषक 2021’ आणि 22,222/- रुपयांचा धनादेश आणि चतृर्थ विजेत्या दिप इलेव्हन संघास ‘कॉंग्रेस चषक 2021’ आणि 11,111/- रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले.
तसेच मॅन ऑफ द सिरीज अनुराग मोहिते, बेस्ट बॅटमन प्रथमेश ओरसे, बेस्ट बॉलर पार्थ पवार यांना स्मृती चिन्ह आणि धनादेश देऊन गौरविण्यात आले. तसेच सहभागी सर्व संघांना सन्मान चिन्ह आणि अंतिम चार संघांतील खेळाडूंना टि शर्ट, मेडल देऊन गौरविण्यात आले.



















Join Our Whatsapp Group