पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप आणि माजी नगरसेवक शंकरशेठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली युवानेते अनिकेत पंढरीनाथ दळवी यांच्या वतीने प्रभाग क्र.१७ आणि १९ मधील तब्बल १० हजार नागरिकांना तिळगूळ वाटप करण्यात आले.
![](https://pclive7.com/wp-content/uploads/2022/01/APSARA-CAMPAIGN-1-2-1024x1024.jpg)
दळवीनगर परिसरातील युवा नेतृत्व अनिकेत दळवी यांच्यावतीने नियमितपणे विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. कोरोना महामारीच्या काळातही अनिकेत यांनी अनेक गरजूंना मदतीचा हात दिला होता. मकर संक्रांती निमित्त देखील त्यांनी परिसरातील प्रत्येक घरी जाऊन नागरिकांना तिळगूळ वाटप केले. तसेच परिसरातील तरूण वर्ग आणि जेष्ठ नागरिकांच्या देखील भेटी घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
प्रभाग क्र.१७ आणि १९ मधील दळवीनगर, पांढरकर चाळ, समर्थ कॉलनी, भोईरनगर, इंदिरानगर, प्रेम लोक पार्क मधील सर्व सोसायटीत, उद्योगनगर, खांबे मळा, उद्योगनगर मधील सर्व सोसायटीत, S.K.F कॉलनी, विजयनगर, बिजलीनगर, शिवनगरी मधील सुमारे १० हजार नागरिकांना अनिकेत दळवी यांच्या वतीने तिळगूळ वाटप करण्यात आले.
तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रेमलोक पार्क मधील दवाखान्यातील डाॅक्टर, नर्स व सर्व कर्मचारी वर्ग आणि प्रभागातील सर्व सफाई कर्मचारी यांना अनिकेत दळवी यांनी तिळगूळ देऊन मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. युवानेते अनिकेत दळवी यांनी मकर संक्रांतीनिमित्त केलेल्या या तिळगुळ वाटपाच्या आयोजनाला सर्वच स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.