पिंपरी (Pclive7.com):- स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त आज छावा संघटनेच्या दिघी शाखेचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला. दिघी जकात नाका व मॅकझिन चौक येथे छावा संघटनेच्या २ शाखांचे उद्घाटन छावाप्रमुख धनंजयभाऊ जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

सर्व जाती धर्मातील युवकांना एकत्र करून छावा संघटनेच्या माध्यमातून समाजपयोगी कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. सोबतच मराठी युवकांना रोजगारक्षम करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे, महाराष्ट्र शासनाच्या विविध महामंडळाच्या माध्यमातून व्यवसायासाठी अधिक मदत कश्या प्रकारे करता यासाठी शासन स्तरावर काम केले जात आहे, असे मत यावेळी छावाप्रमुख धनंजय जाधव यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी शिक्षण मंडळ सभापती चेतन घुले, नगरसेविका निर्मलाताई गायकवाड, नगरसेवक प्रदिप आबा तापकीर, नगरसेवक विकास भाऊ डोळस, सुधीर काळजे, कुलदीपभाऊ परांडे, अमोल देवकर, सोमनाथ ढोले, विनोद परांडे, अजय बांडे, श्रद्धा देशमुख, अमोल वीर व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी छावा संघटना पुणे जिल्हा उपाध्यक्ष प्रविण भोसले, सुमित भोराडे, वैभव गोरडे, प्रज्वल भोसले, गणेश तापकीर, साळुंखे सर, युवराज धोत्रे, प्रणव गरुड, रोहित शिंदे व अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.





















Join Our Whatsapp Group