पिंपरी (Pclive7.com):- निगडी येथील खान्देश मराठा मंडळाच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने गरजू ज्येष्ठ नागरिकांची मोफत नेत्रतपासणी, औषधोपचार, चष्मे वाटप आणि अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. निगडी येथील खान्देश मराठा मंडळाच्या सांस्कृतिक भवनात घेण्यात आलेल्या शिबिरात २३० जणांनी लाभ घेतला.
या शिबिराचे उद्घाटन प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते साहित्यिक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरासाठी पिंपरी येथील डी.वाय पाटील हॉस्पिटलचे डॉ.हर्षद पाटील आणि देसाई हॉस्पिटल पुणेचे डॉ.महेश पवार आणि ऑप्टिकल उद्योगपती दैवत पाटील यांचे सहकार्य लाभले.
यावेळी महानगरपालिकेचे सत्तारूढ पक्षनेता नामदेव ढाके, राजेंद्र साळुंके, संतोष पाटील, बी.डी पाटील, माधव पवार, भास्कर पाटील, एस आर पाटील, सुरेश पाटील, जयवंत शिसोदे, के.सी अहिरराव, सुरेखा पाटील, प्रतिभा पाटील, देवयानी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविकात बी.के पाटील यांनी १ मे १९८६ यावर्षी मंडळाची स्थापना करण्यात आली आणि त्यामागील हेतू सांगितला.
पद्मश्री प्रभुणे म्हणाले कि, खान्देश मधील चार जिल्ह्यातील खांदेशवासीयांनी एकत्र येवून मंडळ स्थापन केले. एकमेकांच्या समस्या सोडवल्या. मात्र त्यांनी आजही आपल्या संस्कृतीचे जतन केले आहे. कोरोना काळात सामाजिक जाणिवेचे भान ठेवून मंडळाने आपले कार्य केले. असे अध्यक्ष गुलाबराव पाटील यांनी सांगितले आणि मंडळाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
याप्रसंगी पुनरुत्थान समरसता गुरुकुलमला मंडळाच्यावतीने आणि अध्यक्ष गुलाबराव पाटील यांच्या वतीने देणगीचे धनादेश प्रभुणे यांच्याकडे सुपूर्द केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संजय पवार यांनी आणि आभार प्रदर्शन प्रदीप शिंदे यांनी केले.
























Join Our Whatsapp Group