पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या प्रक्रीयेला अखेर सुरूवात झाली आहे. निवडणुकीसाठीचा प्रारुप प्रभाग रचनेचा आराखडा मंगळवार दि.०१ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर ०१ ते १४ फेब्रुवारी दरम्यान हरकती सूचना मागविल्या आहेत.
प्राप्त हरकती १६ फेब्रुवारी रोजी आयोगाला सादर कराव्या लागणार आहेत. दि.२६ फेब्रुवारी रोजी या हरकतींवर सुनावणी होईल. सुनावणीनंतर प्राधिकृत अधिकाऱ्यांनी केलेल्या शिफारसी ०२ मार्च रोजी निवडणूक आयोगाला पाठवले जातील. राज्य निवडणुक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी हा कार्यक्रम महापालिकेला पाठविला आहे.
■ आराखडा प्रसिद्धीचा कार्यक्रम..!
▪ निवडणूक प्रभागांच्या सीमा दर्शवणारी प्रारूप अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे व त्यास प्रसिद्धी देणे ०१ फेब्रुवारी २०२२
▪ प्रारुप अधिसूचनेवर हरकती व सूचना मागण्याचा कालावधी ०१ ते १४ फेब्रुवारी २०२२
▪ प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांचे विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगास सादर करणे १६ फेब्रुवारी
▪ राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांमार्फत हरकती व सूचना यावर सुनावणी देण्याचा अंतिम दिनांक २६ फेब्रुवारी
▪ सुनावणीनंतर प्राधिकृत अधिकाऱ्यांनी केलेल्या शिफारशी विहित नमुन्यात नमूद करून विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगास पाठवण्याचा दिनांक ०२ मार्च २०२२