पिंपरी (Pclive7.com):- युवासेना भोसरी विधानसभा पदाधिकारी मार्गदर्शन मेळावा संपर्कप्रमुख शिवाजीदादा आढळराव पाटील, जिल्हा संघटिका सुलभाताई उबाळे, शहरप्रमुख सचिन भोसले, भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट शहर संघटक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली यमुनानगर येथे पार पडला. या मेळाव्यासाठी संपर्कप्रमुख केशरी नाथ पाटील, रामभाऊ उबाळे उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना केसरी नाथ पाटील म्हणाले की, भोसरी विधानसभेमध्ये युवासेना ही शिवसेनेचा कणा आहे. तसेच सर्व युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे उमेदवार निवडून आणण्यासाठी मह्त्वाची भूमिका पार पाडावी. आगामी पालिका निवडणुकीत शिवसेनेचे जास्तीक जास्त नगरसेवक निवडून आणून साहेबांचे शिलेदार पालिकेत पाठवा.
तसेच आगामी काळात प्रत्येक प्रभागात युवासेनेचे पदाधिकारी नेमून प्रत्येक प्रभागात युवासेनेचे मेळाव्याचे नियोजन करावे. आगामी काळात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे व युवासेना सरचिटणीस उपनेते वरूनजी सरदेसाई यांचे दौरे होतील असेही शेवटी बोलताना ते म्हणाले.
हा मेळाव्याचे नियोजन अजिंक्य उबाळे, अमित शिंदे, सार्थक दोशी, राहुल ठाकरे, अभिजित गिरी, ओंकार मोरे, सुरज झंजूरणें, अनिकेत येरूनकर, आकाश खरात, अविनाश खडके, अभिषेक सुरवसे, अमित आल्हाट, स्वप्नील शिरसाठ तसेच भोसरी विधानसभेतील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
























Join Our Whatsapp Group