पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी यापूर्वीचे निर्बंध रद्द करून दिघी-आळंदी विभागांतर्गत वाहन उभे करण्यास मनाई करण्याचे (नो पार्कींग) तात्पुरत्या स्वरुपातील आदेश निर्गमित केले आहेत.

या आदेशानुसार ममता स्वीट्स ते दत्तनगरकडे, दिघी गावठाणकडे, दिघी रोडकडे व फुगेवाडी बसस्टॉपकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूस आणि घुंडरे आळी चौकापासून चाकण चौकाकडे, वडगाव चौकाकडे, केळगाव चौकाकडे, माऊली मंदिराकडे अशा घुंडरे आळी चौकाच्या चारही बाजूच्या रस्त्यावर ५० मी. नो पार्कींग असेल. साईमंदिर कमान समोरील सेवा रस्ता (सर्व्हिस रोड) ते मॅगझीन चौकाकडे व आळंदीकडे जाणाऱ्या मार्गावर १०० मी. नो पार्कींग असेल.
























Join Our Whatsapp Group