आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेविका अनुराधा गोरखे यांच्यावतीने शिबिराचे आयोजन
पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्रमांक १० मधील दत्तनगर-विद्यानगर परिसरात आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त हाडांची ठिसूळता तपासणी शिबिराचे आयोजन आज रविवार (दि.२०) रोजी करण्यात आले होते. या शिबिरात ३४४ नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली.

कार्यक्रमाचे उद्घाटन माजी उपमहापौर तुषार हिंगे, भाजपा सरचिटणीस राजू दुर्गे, अमित गोरखे, संभाजी नाईकनवरे, शुभांगी कसबे यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाला मंगेश चौधरी, शाम विटकर, अरुण गाडे, सिद्धेश्वर भोसले, राजू विटकर, गणेश लोंढे, राम लोंढे, नितीन शिंदे, भाजपा युवती सरचिटणीस शुभांगी कसबे, अपर्णा अलंकार, चंद्रकांत राऊत आदी उपस्थिती होते.

या शिबिराचे आयोजन अनुराधा गोरखे यांनी केले होते. डॉ. विष्णु नांदेडकर यांनी मार्गदर्शन केले. शिबिराला नांदेडकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे सहकार्य लाभले. अमोल कुचेकर यांनी आभार मानले.
Tags: latest marathi newsPCLIVE7.COMPCMCPcmc newsअनुराधा गोरखेआमदार लक्ष्मण जगतापदत्तनगर-विद्यानगरहाडांची ठिसूळता तपासणी शिबिर





















Join Our Whatsapp Group