पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची फेब्रुवारी महिन्याची सभा दि.१७ मार्च महिन्यापर्यंत तहकूब करण्यात आली आहे. दरम्यान महापालिका सदस्यांचा कार्यकाळ पुढच्या महिन्यात संपत आहे. तरी महापौरांनी विशेष महासभेचे आयोजन करण्यात यावे अशी मागणी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.

यासंदर्भात राष्ट्रवादीच्या वतीने महापौर माई ढोरे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शहराध्यक्ष तथा नगरसेवक अजित गव्हाणे, नगरसेवक नाना काटे, राजू बनसोडे, पोर्णिमा सोनवणे, सुलक्षणा शिलवंत-धर, प्रवीण भालेराव, मयूर कलाटे आदी उपस्थित होते.

या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेची महासभा कार्यक्रम पत्रिका क्रमांक 67 दि.18/02/2022 ची सभा दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करून दि. 17/03/2022 पर्यंत तहकूब केलेली आहे. परंतू आपल्या महापालिकेच्या सदस्यांची मुदत कार्यकाळ हा दि. 13/03/2022 रोजी संपुष्टात येत असलेने महापालिका विसर्जित होणार आहे. त्यामुळे दि. 17/03/2022 रोजी महासभा होऊ शकणार नाही. महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार आम्ही स्थायी समितीचे चार सदस्य विशेष महासभेचे आयोजन करण्याची मागणी करत आहोत.
दि.18/02/2022 रोजी तहकूब करण्यात आलेली महासभा ही सध्याच्या नगरसेवकांची शेवटची सभा ठरणारी असतानाही ही सभा घेण्यात आलेली नाही. तसेच तहकूब दिनांकाची सभा कार्यकाळ संपुष्टात येणार असल्याने होणार नसल्याचे विशेष महासभा घेणे हे अत्यंत गरजेचे आहे. गेल्या पाच वर्षातील विकास कामांसह इतर अनेक मुद्यांवर या सभेमध्ये चर्चा करणे अपेक्षित आहे. सध्या अनेक मुद्दे शहर पातळीवर चर्चेत असल्यामुळे महापालिकेची नाहक बदनामी होत आहे. या मुद्यांवर चर्चा घडून आल्यास नागरिकांमध्ये असलेलेले समज-गैरसमज दूर होण्यास मदत होईल. विशेष करून भ्रष्टाचाराच्या मुद्यावर चर्चा व्हावी.
सर्वसामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याचे शहरातील विकासकामांबाबतचे मुद्दे तसेच भय, भष्टाचार आणि विकास या मुद्यांवर देखील सर्वसाधारण सभेत चर्चा होणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने आपण आठवडाभरात महासभेचे आयोजन करावे, अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे. ही मागणी लवकर मान्य करून शहरवासीयांना दूध का दूध पानी का पानी होऊन जाऊ द्या अशी मागणी राजू बनसोडे प्रविण भालेकर पौर्णिमा सोनवणे सुलक्षणा धर या स्थायी समितीच्या सदस्यांनी केली आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रलंबित विकासासाठी ही महासभा खूप महत्त्वाची आहे. यासाठी महापौर निश्चित भूमिका सकारात्मक घेतील अशी अशा आहे
– अजित गव्हाणे, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस.






















Join Our Whatsapp Group