पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथे प्रतिवर्षाप्रमाणे शिवशंभो सेवा मंडळतर्फे महाशिवरात्री महोत्सव व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताहाचे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते तथा विद्यमान नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते (दि.२६) विणापूजन व ग्रंथराज ज्ञानेश्वरीपूजन करून सप्ताहाला सुरुवात करण्यात आली.

यावेळी शिवशंभो मंडळाचे संस्थापक श्री.ज्ञानेश्वर हांडे, अध्यक्ष श्री.संपत मेटे, उपाध्यक्ष श्री ऋषिकेश कुटे, श्री सेक्रेटरी श्री. बाळासाहेब भुंडे, उपसेक्रेटरी श्री. शंकर भालेकर, खजिनदार सचिन काटे, कार्याध्यक्ष नंदकुमार काटे, उपकार्याध्यक्ष कृष्णकांत माकणीकर, सदस्य चंद्रकांत मुरकुटे, शेखर काटे, गणेश काटे, संजय कुटे, सुनील काटे, बाळासाहेब बोड्के, संदिप काटे, दत्तात्रय काटे, संभाजी काटे, सुरेश काटे, बाळासाहेब काटे, जयसिंग चव्हाण, अनिल काटे, भरत काटे, सुरेश कुंजीर, , राजू काटे, नवनाथ काटे, विकास टकले, संजय काटे, अशोक काटे, पुजारी ज्ञानेश्वर मुसंडे, सोमनाथ काटे, अनिल सागवेकर, व आजी माजी सभासद, भाविक भक्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शनिवार दि.२६ फेब्रुवारी ते ५ मार्च २०२२पर्यंत अखंड हरिनाम सप्ताहच्या दरम्यान विविध नामवंत महाराजांचे सुश्राव्य किर्तन सायं. ७ ते ९ या वेळेत होणार आहे. शनिवार दि.२६ फेब्रुवारी ह.भ.प.सागर महाराज बोराटे सर, रविवार दि.२७ फेब्रुवारी ह.भ.प.गणेश महाराज वारिंगे, सोमवार दि.२८ फेब्रुवारी हभप संतोष महाराज वनवे, मंगळवार दि.१ मार्च ह.भ.प.प्रकाश महाराज साठे, बुधवार दि.०२मार्च ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज कदम, गुरुवार दि.०३ मार्च ह.भ.प संतोष महाराज पायगुडे, शुक्रवार दि.०४ मार्च हभप.समाधान महाराज शर्मा, व शनिवार दि.०५ मार्च सकाळी १० ते १२ ह.भ.प.मच्छिंद्र महाराज कुंभार यांचे काल्याचे कीर्तन होणार असून महाप्रसादाची वेळ दु.१ ते ३ पर्यंत आहे. तरी भाविकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा असे शिवशंभो सेवा मंडळाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
Tags: ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळानाना काटेपिंपळे सौदागरमहाशिवरात्रीशिवशंभो सेवा मंडळश्री महादेव मंदीर



















Join Our Whatsapp Group