पिंपरी (Pclive7.com):- येत्या एक एप्रिल २०२२ पासून पिंपरी चिंचवडमध्ये लाँड्री व्यवसायीकांनी आपल्या दरांत वाढ करण्याचा निर्णय घेतला असून यामुळे परिटघडी वापरणार्यांच्या खिशाचा भुर्दंड वाढणार आहे.

या संदर्भांत माहिती देताना पिंपरी चिंचवड लाँड्री संघटनेचे संस्थापक कार्याध्यक्ष भाई विशाल जाधव यांनी सांगितले की, कोरोनाच्या काळात लाँड्री व्यवसायीकांवर मोठं संकट कोसळल होत. लाँड्री व्यवसाय करणारे हे बारा बलुतेदार आहेत. अनेकांचा हा पारंपारीक व्यवसाय आहे. असे असताना कोरोना काळात या व्यवसायीकांच्या मदतीसाठी कोणीही आले नाही. राज्यभरातील विविध संघटनांच्यावतीने या व्यवसायीकांना मदतीचा हात द्यावा अशी विनंती शासनाला करण्यात आली होती. मात्र या विनंतीकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.
लाँड्री व्यवसायीक कोरोनाच्या आपत्तीनंतर आजही सावरलेला नाही. कोरोना काळात सर्व दुकाने बंद करावी लागली होती. परंतु अश्या परिस्थितीत दुकान मालकांनी भाडे सुद्धा माफ केले नाही. मात्र त्या काळातही प्रामाणिक, कष्टकरी लाँन्ड्री व्यवसाईकांनी भाडे भरल आहे. बँकेकडून घेतले गेलेली कर्ज काही वेळत न भरणाऱ्या व्यावसायिकांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. अश्या परिस्थितीत काही कारागीर व लाँन्ड्री मालकांवर उपासमारीची वेळ आली. आता पेट्रोल व डिझेल, गॅस, सर्वच ठिकाणी महागाई वाढली असून आम्हाला व्यवसाय करणे कठीण झाले आहे. धुलाई मटेरियल सुद्धा खुप महाग झाले आहे. म्हणून पिंपरी चिंचवड शहर लॉड्री संघटनेने आता दरवाढीचा निर्णय घेतला असल्याचे विशाल जाधव यांनी सांगितले.
एक एप्रिलपासून नवीन दर
इस्त्री
१ ड्रेस ₹ १६/-
१ साडी ₹ ५०/-
धुलाई
१ ड्रेस ₹ ९०/-
१ साडी ₹ १५०/-
सर्व पिंपरी चिंचवड शहरातील लाँन्ड्री चालक व मालक यांना जाहीर अहवान करण्यात येत आहे की लवकरात लवकर आपण संघटनेचे सभासद होऊन येणार्या काळात प्रगती साधा जे व्यवसायीक नव्या दराने काम करणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा निर्णयही संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीस भाई विशाल जाधव, रविंद्र धोंगडे, विनोद पोतेकर, अंतराम डोंगरे, बालाजी वाघमारे, संतोष सौदागर, विक्रम जाधव, राहुल मुळे, सुशिल काटे, विलास व्यवहारे, विशाल सोनटक्के आदी उपस्थित होते.
Tags: इस्त्रीइस्त्रीच्या दरात वाढकपड्यांना इस्त्रीपरिटघडीपिंपरी चिंचवडपिंपरी चिंचवड लाँड्री संघटनामहागाईविशाल जाधव
























Join Our Whatsapp Group