मावळ (Pclive7.com):- भटकंतीला गेलेल्या पिंपरी चिंचवडमधील आयटी कंपनीतील तरुणांच्या ग्रुपवर मधमाश्यांनी हल्ला चढवल्याचा प्रकार समोर आला आहे. धूम्रपान केल्याने त्याचा धूर मोहोळापर्यंत पोहचला आणि मधमाश्यांनी तरुण आणि तरुणीवर हल्ला चढवल्याची माहिती आहे. पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यात लोणावळा परिसरातील कातळदरा येथे ही घटना घडली. रविवारी भटकंती करण्यासाठी गेलेल्या आयटी तरुणांच्या ग्रुपवर मधमाश्यानी हल्ला चढवला होता. दुखापतग्रस्त तरुण-तरुणींना उपचार करुन सोडून देण्यात आले.

नेमकं काय घडलं?
भटकंतीसाठी गेलेल्या पिंपरी चिंचवडमधील आयटी कंपनीच्या तरुणांच्या ग्रुपवर मधमाश्यांनी हल्ला चढवला. तरुणांनी धूम्रपान केल्याने त्याचा धूर मोहोळापर्यंत पोहचल्याचं बोललं जात आहे. यामुळेच मधमाश्यांनी तरुण आणि तरुणीवर हल्ला चढवल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भटकंतीला गेलेल्या सात जणांना चावा
भोसरी, रावेत येथील अकरा जणांचा ग्रुप मावळमध्ये भटकंती करण्यास गेला होता. यापैकी सात जणांचा मोहोळातील मधमाशांनी कडाडून चावा घेतला. पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यात लोणावळा परिसरातील कातळदरा येथे रविवारी ही घटना घडली.
जखमी तरुण-तरुणींवर रुग्णालयात उपचार
शिवदुर्ग मित्र लोणावळा आणि वन्यजीवन रक्षक संस्था यांनी घटनास्थळी जाऊन तात्काळ मदत केली. जखमी तरुण-तरुणींवर रुग्णालयात उपचार करुन त्यांना सोडून देण्यात आलं आहे.






















Join Our Whatsapp Group