पिंपरी (Pclive7.com):- शास्तीकर वगळून मूळ मिळकत कर स्वीकारण्यास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी माजी स्वीकृत सदस्य दिनेश यादव व संतोष मोरे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.

यादव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेमार्फत राबविण्यात आलेल्या योजनेची मुदत ३१ मार्चपर्यंत आहे. मागील दोन वर्षापासून कोरोना काळामुळे सर्व नागरिकांची आर्थिक परिस्थिती विस्कळीत झाली आहे. त्यामुळे नागरिकांना योजनेचा फायदा मिळण्यासाठी ११ एप्रिलपर्यंत मुदतवाढ मिळण्यात यावी.
अनेक उद्योग व्यवसाय कोरोनामुळे अडचणीत आहेत. सर्वसामान्य जनता बेरोजगारीचा सामना करत आहे. अनेक उद्योजक कोरोनामुळे मृत्यू देखील पावलेत. गांभीर्याने विचार करीत शास्तीकर वगळून मिळकत कर स्वीकारण्यास मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी संतोष मोरे व दिनेश यादव यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.





















Join Our Whatsapp Group