
याचबरोबर, न्यायालयाच्या आदेशानुसार नवाब मलिक यांना बिछाना आणि खुर्ची उपलब्ध करून दिली जाणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे. शिवाय त्यांना घरचं जेवण आणि औषधी घेण्यासही न्यायालयाकडून परवानगी दिली गेली आहे.
ईडीने मलिक यांना २३ फेब्रुवारीला मनी लॉन्डरिंग प्रकरणात अटक केली होती. यानंतर न्यायालयाने नवाब मलिक यांना न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे.
मलिक यांच्यावर ३०० कोटींच्या संपत्तीसंदर्भातील नेमके आरोप काय?
दाऊद टोळीकडून अनेकांना धमकावून वादातील मालमत्ता बळकावण्यात आल्या होत्या. त्यातील एक पीडित असलेली मुनीरा प्लंबर यांची कुर्ला येथे तीन एकर जमीन होती. सध्या त्याची किंमत ३०० कोटी रुपये आहे. ही जागा मलिक आणि हसिना पारकर यांनी बळकावल्याचा मुख्य आरोप आहे.





















Join Our Whatsapp Group