पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएम) सिटी स्कॅन मशीन दोन दिवसांपासून बंद आहे. परिणामी रुग्णांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. वायसीएम रुग्णालयातील रुबी अल केअरमध्ये सिटी स्कॅनची सोय आहे.

वायसीएम रुग्णालयात रुबी अल केअरच्या माध्यमातून सिटी स्कॅन केले जाते. खासगी रुग्णालयाच्या तुलनेत येथे कमी पैश्यात सिटी स्कॅन केले जाते. परिणामी सिटी स्कॅन करण्यासाठी रोज मोठ्या प्रमाणावर गर्दी असते.
वायसीएम हे महापालिकेचे शहरातील सर्वात मोठे रुग्णालय आहे. येथे सर्व प्रकारच्या रुग्णांवर उपचार केले जातात. त्यामुळे शहरातील आणि शहराबाहेरील रुग्ण येथे उपचार घेण्यासाठी येत असतात. सिटी स्कॅन काढण्यासाठी येथे रोज रांगा लागत असतात. ही मशीन गेल्या दोन दिवसापासून बंद असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
लवकरच मशीन होणार
लवकरात लवकर सिटी स्कॅन मशीन सुरु करण्याची मागणी रुग्णांकडून होत आहे. मशीन बंद असली तरी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता पर्यायी व्यवस्था असणे आवश्यक आहे. तांत्रिक कारणामुळे सिटी स्कॅन मशीन बंद आहेत. संबंधित यंत्रणेला लवकर मशीन सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत, रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले.






















Join Our Whatsapp Group