पिंपरी (Pclive7.com):- फुगेवाडी पुलाखालील परिसरात सी.सी. टिव्ही कॅमेरा बसविण्यात यावेत अशी मागणी पिंपरी युवासेने कडून करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्र.३० फुगेवाडी पुलाखालील शिवसेना शाखेजवळील परीसरात चोरीचे प्रमाण वाढले आहे. बाजूला रेल्वे हद्द असल्याने त्याठिकाणी मद्यपीसह चरसी, गंजाडी अश्या व्यसनाधीन अल्पवयीन मुलांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. चोरी, छेडछाड, धमकावणे, मारामारी यांसारखे प्रकार वारंवार पहावयास मिळतात.
तरी स्मार्ट सिटी अंतर्गत संपूर्ण शहर CCTV च्या देखरेखीत करण्याचे काम सुरू आहे. त्यास बराच कालावधी लागणार आहे. तत्पूर्वी आपण त्याठिकाणी लवकरात लवकर सीसी टिव्ही कॅमेरे बसवावेत. जेणेकरून यासर्व गोष्टींना आळा बसेल. अशा मागणीचे निवेदन अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे ह्यांच्याकडे पिंपरी युवासेना युवाअधिकारी निलेश हाके ह्यांनी दिले आहे.






















Join Our Whatsapp Group