पिंपरी (Pclive7.com):- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अखत्यारीत असलेल्या महामंडळांच्या भाग भांडवलात गुरुवारी (दि. 28) राज्य मंत्री मंडळाच्या झालेल्या बैठकीत मोठी वाढ करण्यात आली आहे. साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे यांच्या पाठपुराव्यास मोठे यश आले आहे.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या भागभांडवलाची मर्यादा 300 कोटींवरून 1000 कोटी करण्यात आली आहे. अमित गोरखे यांनी या संदर्भात वेळोवेळी पत्रव्यवहार केला होता. त्यासंदर्भात त्यांना सामाजिक न्याय विभागाचे सचिव तसेच राज्याचे राज्यपाल यांचे भागभांडवल वाढवण्या संदर्भात पत्राची दखल घेतल्याचे उत्तरही आले होते.
अण्णाभाऊ साठे महामंडळाचे भागभांडवल वाढल्याने समाजाच्या अनेक संघटनांनी अमित गोरखे यांचे अभिनंदन केले आले. त्याचबरोबर सरकारचेही अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतले असल्याने अभिनंदन करण्यात आले आहे.
महामंडळांचे भागभांडवल मोठ्या प्रमाणात वाढवल्याने अनुसूचित जातीतील घटकांसह या महामंडळांच्या लाभार्थी घटकांना कर्ज वाटप, रोजगार व स्वयं रोजगारांच्या वाढीव संधी, दीर्घ मुदत कर्ज योजना, कैशल्य विकासाच्या विविध योजना राबविण्यात येऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यात मोठा हातभार लागणार असल्याचे अमित गोरखे यांनी म्हटले आहे.
या महामंडळाचे भागभांडवल वाढविण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला असून या निर्णयाबद्दल महाविकास आघाडी सरकारचे गोरखे यांनी आभार मानले आहेत.






















Join Our Whatsapp Group