पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड गुरव समाज संस्थेच्या वतीने उद्या (रविवार दि.०१ मे २०२२) रोजी राज्यस्तरीय वधू वर सूचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. चिंचवड येथील जैन शाळे जवळ असलेल्या चैतन्य सभागृहात सकाळी १० ते दुपारी ०३ वाजेपर्यंत हा मेळावा संपन्न होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष श्रीहरी गुरव यांनी दिली आहे.

यावेळी पुणे शहर गुरव समाज संस्थेचे मुकुंद दीडभाई, हडपसर गुरव समाज संस्थेचे मधुकर गुरव, नगरसेवक शीतल शिंदे, नूतन शैव गुरव समाज संस्थेचे गिरीश आगलावे, पुणे गुरव समाज संस्थेचे शैलेंद्र आगलावे, पोलीस उपअधीक्षक सतीश पाटील, उद्योजक गणेश फुलारी, प्राध्यापिका माधुरी गुरव, महादेव गुरव आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
याप्रसंगी संस्थेच्या वधू-वर मोबाईल ॲप्सचे देखील अनावरण करण्यात येणार आहे. तरी या राज्यस्तरीय वधू-वर सूचक मेळाव्यास जास्तीत जास्त समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री हरी गुरव यांनी केले आहे.






















Join Our Whatsapp Group