पिंपरी (Pclive7.com):- भाजप आणि महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणाचा फूटबॉल केला असल्याचा आरोप आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवडचे कार्यकारी अध्यक्ष चेतन गौतम बेंद्रे यांनी केला आहे.

यासंदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकार आणि भाजप दोघे ओबीसी आरक्षणासंदर्भात गंभीर नव्हते आणि फक्त एकमेकांवर चिखलफेक करत होते. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश हा नाकारता येणार नाही, पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे ही आम आदमी पार्टीची मागणी पहिल्यापासून राहिली आहे आणि या पुढे ही राहील. पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूकीसंदर्भात आम आदमी पार्टी तयार आहे आणि सर्व जागा लढवविणार आहे.
आप महानगरपालिकेची निवडणूक पहिल्यांदाच लढवत असून लोकांना अरविंद केजरीवाल यांचे शिक्षण, आरोग्यावर आधारित दिल्ली मॉडेल मनात भरले आहे आणि संपूर्ण पिंपरी चिंचवडकर याची मागणी करत आहे. लोकांच्या मनातच आप असल्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आप चांगली कामगिरी करेल आणि जनतेचे खरे नगरसेवक पालिकेत रुजू होतील अशी आम्हाला खात्री असल्याचे चेतन बेंद्रे यांनी म्हटले आहे.
























Join Our Whatsapp Group