आळंदी (Pclive7.com):- महाराष्ट्र राज्य माध्यमिक एस.एस.सी. (दहावी) परीक्षेचा आज ऑनलाइन निकाल जाहीर झाला. आळंदी देवाची येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनियर कॉलेज मधील एकूण ४१२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यात ३९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा एकूण ९५.१४% निकाल लागला.

त्यामध्ये विशेष प्रावीण्य (डिस्टिनेशन) मध्ये ६३ विद्यार्थी, प्रथम श्रेणी मध्ये १५७ विद्यार्थी, द्वितीय श्रेणी मध्ये १३२ तर पास श्रेणीत ४० विद्यार्थी यशस्वी झाले. यात दिक्षा रविकांत राऊत या विद्यार्थीनीने ४८९/५०० (९७.८०%) गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक, संस्कृती सुधीर चव्हाण या विद्यार्थीनीने ४७४/५०० (९४.८०%) गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक तर आकांक्षा वसंत भुजबळ या विद्यार्थीनीने ४७०/५०० (९४.००%) गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक प्राप्त करून यश संपादन केले.

या सर्व यशस्वी विद्यार्थी, शिक्षक वृंदाचे तसेच गुणवत्ता वाढ व विकास समितीचे व विद्यालयाचे पर्यवेक्षक प्रशांत सोनवणे यांचे संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, सचिव अजित वडगावकर, खजिनदार डॉ. दिपक पाटील, विश्वस्त लक्ष्मण घुंडरे, प्रकाश काळे, विद्यालयाचे प्राचार्य दिपक मुंगसे तसेच संस्थेच्या व विद्यालयाच्या सर्व घटकांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.






















Join Our Whatsapp Group