पिंपरी (Pclive7.com):- आम आदमी पार्टीच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी वैजनाथ शिरसाट यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पक्षाची नवीन शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रभारी प्रकाश जरवाल, प्रदेश कार्याध्यक्ष अजित फटके पाटील, प्रदेश सचिव डॉ. अभिजीत मोरे, प्रदेश संघटन मंत्री सागर पाटील आणि शहराध्यक्ष वैजनाथ शिरसाट यांच्या स्वाक्षरीने ही कार्यकारिणी घोषित करण्यात आली. नवीन कार्यकारिणीत विविध पदांवर अनुभवी आणि सक्रिय कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली असून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला आहे.

शहर कार्यकारिणीत डॉ. अनिल रॉय, चंद्रमणी जावळे, अशोक लांडगे, दत्तात्रय काळजे, यशवंत कांबळे आणि अक्षय माने यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. स्वप्निल जेवळे यांची महासचिवपदी, तर इम्रान खान आणि ज्योती शिंदे यांची सचिवपदी निवड करण्यात आली आहे. प्रकाश हगवणे यांच्याकडे मुख्य प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

संघटन मंत्री म्हणून सचिन थोरात, मंगेश आंबेकर, अखिल शेख, निकित शिंदे, सुनिल शिवशरण आणि डॉ. अमर डोंगरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अजय सिंग, अर्चना सोनवणे, सुरेश भिसे आणि सुखदेव कारळे यांची सहसंघटन मंत्री म्हणून निवड करण्यात आली. याशिवाय सुप्रिया गायकवाड यांची पिंपरी विधानसभा महिला अध्यक्ष, विकी पासोटे यांची युवा आघाडी अध्यक्ष, राहुल मदने यांची ओबीसी आघाडी अध्यक्ष, भारती जाधव यांची महिला बचतगट आघाडी प्रमुख, कुणाल वाक्टे यांची आयटी सेल प्रमुख, शुभम यादव यांची कामगार आघाडी प्रमुख, सुरेश बावनकर यांची उद्योग आघाडी प्रमुख, आंगद मुंगळे यांची रिक्षा संघटना प्रमुख आणि विजय चंडाळ यांची क्रीडा आघाडी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच शिवकुमार बनसोडे, सीमा बावनकर, संतोष जाधव आणि राज चाकणे यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून आगामी महापालिका निवडणुका आणि शहरातील विविध जनहिताच्या प्रश्नांवर पक्ष अधिक प्रभावीपणे काम करेल, असा विश्वास शहराध्यक्ष वैजनाथ शिरसाट यांनी व्यक्त केला आहे.




















Join Our Whatsapp Group