पिंपरी (Pclive7.com):- पानटपरी बंद करत असताना फिर्यादीच्या ओळखीच्या आरोपीने फिर्यादीकडे पैशांची मागणी केली. मात्र, फिर्यादीने पैसे दिले नाही. या कारणावरून आरोपीने फिर्यादीच्या डोक्यात सिमेंटच्या गट्टूने मारले, तसेच गाडीवर आलेल्या आरोपीच्या दोन साथीदारांनीही फिर्यादीला हाताने मारहाण केली.

तसेच पान टपरीच्या ड्रॉवरमधून ७०० रुपये घेऊन गेले. ही घटना मोरवाडी येथील नाना नानी पार्क, कापसे उद्यान येथे घडली.अरविंदकुमार सिंह (वय २१ वर्षे, रा. मोरवाडी, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे.

कुंदन गायकवाड (वय २२ वर्षे, मोरवाडी, पिंपरी) असे आरोपीचे नाव आहे.तो जखमी असून वाय सी एम हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. त्याच्यासह त्याच्या दोन साथीदारांविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.























Join Our Whatsapp Group