पिंपरी (Pclive7.com):- थेरगाव येथील डांगे चौकात असलेल्या ग्रेडसेपरेटरमध्ये आज (दि.०७) सकाळी ११ वाजता मोठ्या प्रमाणात ऑईल गळती झाली होती. त्यानंतर १५ ते २० दुचाकीस्वार त्याठिकाणी घसरून पडल्याने जखमी झाले होते. मात्र या घटनेची माहिती मिळताच थेरगाव सोशल फाऊंडेशनची टीम घटनास्थळी दाखल झाल्याने मोठी दुर्घटना टळली.
याप्रकाराची माहिती मिळताच थेरगाव सोशल फाऊंडेशनची टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी तातडीने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक दलास कळविले. अग्निशामक दल दाखल होईपर्यंत थेरगाव सोशल फाऊंडेशनच्या टीमने वाहतूकीचे नियोजन केले. या ॲाईल गळतीमध्ये १५ ते २० दुचाकीस्वार घसरुन जखमी झाले होते. त्यांना या टीमने प्रथमोपचार करत काहींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले.
अग्निशामक दलाची गाडी आल्यानंतर रस्ता धुऊन पुर्वरत करण्यात आला. यामधे अनेक स्थानिक नागरीकांनीही मदत केली. तसेच यावेळी थेरगाव सोशल फाऊंडेशनचे अनिकेत प्रभु, चेतन पंडीत, शंतनु तेलंग उपस्थित होते.