पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक विभागाने प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना प्रचंड चुका केलेल्या आहेत. पुराव्यासह घेतलेल्या हरकतींवर त्यांच्याकडून योग्य निर्णय झालेला नाही. तसे असताना 21 जुलै 2022 रोजी अंतिम मतदार याद्या जाहीर होणार आहेत. सद्यस्थितीत मतदार याद्यातील चुका बघता प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या करण्यासाठी आणखी दोन आठवडे मुदतवाढ द्यावी, अशी मागणी भाजपचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.

या संदर्भात विलास मडिगेरी यांनी राज्य निवडणूक आयोगासह भारत निवडणूक आयोग, पुणे विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त यांना पत्रव्यवहार केला आहे. यामध्ये प्रभागनिहाय मतदार याद्यामधील त्रृटी पुराव्यानिशी त्यांनी निवडणूक यंत्रणेपुढे मांडल्या आहेत. त्यांनी नमूद केले आहे की, महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये प्रारुप मतदार प्रसिद्धीनंतर एकूण मतदार संख्या 6 हजार 755 इतकी नावे इतर शेजारील प्रभागात म्हणजेच प्रभाग क्रमांक 3, 4, 9, 10, 12, 16 यामध्ये सामाविष्ट केली आहेत. त्याचा संपूर्ण तपशील महापालिकेकडे हरकतीसह 3 जुलै 2022 रोजी सादर केला आहे.
सर्व मतदार रहिवासी पूराव्यानिशी हरकत दाखल केली आहे. तसे असताना निवडणूक विभागाकडील वरिष्ठ अधिकारी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जरी मतदार या प्रभागात राहत असले, तरी त्यांच्या मतदार यादीचे सेक्शन हेड वेगळे असल्यामुळे त्या हेड प्रमाणे आम्ही नावं ज्या त्या प्रभागात टाकणार, असे सांगत आहे. ही बाब संपूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे प्रथमर्शनी दिसून येते.
संपूर्ण शहरातील खूप ठिकाणी अश्याच प्रकारे खूप प्रभागात प्रचंड चुका झाले आहेत ते सर्व मतदार याद्या निष्पक्ष होणे गरजेचे. कारण संख्या खूप मोठी असल्याने फील्ड वरील प्रगणक, उप अभियंता कार्यकारी अभियंता यांनी घाई घाईत काम करून जमा करीत आहेत, पारदर्शक काम झालेली दिसून येत नाही. अंतिम प्रभागरचनेनंतर नागरिक राहत असलेल्या भागातून लोकप्रतिनिधी निवडण्यास मनाई होत आहे. हे नागरिकांवर अन्यायकारक आहे. वास्तविक प्रभागरचनेसंदर्भात माझे आक्षेप होते. ते मला न्याय मिळण्यासाठी मी आपल्याकडे व सर्व ठिकाणी लेखी पत्राव्दारे म्हणणे मांडले आहे. प्रभागरचनेतील चुकांबाबबत उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहेत. मतदार यादीतील चुका निदर्शनास आणणारी अनेक उदाहरणे आहेत. सेक्टर नंबर 4, 6, 9, 11, 13 हा भागात संपूर्ण प्राधिकरणाचा भाग आहे. या भागातील विधानसभेच्या ज्या याद्या आहेत भाग क्रमांक 30 ते 40 व 100 ते 144 मध्ये या भागातील नावे समावेश आहेत. त्यावर जवळपास सर्व याद्यावर जवळपास सेक्शन हेड मोशी, बोऱ्हाडेवाडी, जाधववाडी, कुदळवाडी, चिखली असे लिहिले गेले आहे.
या भागात पहिल्यापासूनच स्थानिक मतदान केंद्र नाही. त्यामुळे सेक्शन हेडवर स्थानिक पत्ता उल्लेख नाही. जितक्या हरकती सादर केल्या आहेत. त्या प्रत्येक हरकतींवर प्रत्येकाचा महापालिका मिळकतकराचा पुरावा जोडला आहे. मुळात विधानसभेच्या सेक्शनमध्ये प्रचंड चुका झालेले आहेत. संतनगर सेक्टर 4, 6, 9, 11, 13 मधील मतदार यादीतील, तसेच इंद्रायणीनगर 1,2,3,7, 10 मधील मतदार याद्याततील सेक्शन हेड चुकीचे आहेत. ते दूरस्थ करणे गरजेचे आहेत. यासह स्थानिक मतदान केंद्र स्टर्लिंग स्कूलमध्ये भाग क्र. 232 ते 241, तर स्वामी समर्थ स्कूलमध्ये भाग क्र. 272 ते 279 तसेच 280 ते 286 हे प्रभाग 8 मध्ये होते. आता तीन प्रभागरचनेनुसर दोन्ही शाळा प्रभाग 10 मध्ये गेल्या आहेत. प्रभाग 8 मध्ये स्थानिक शाळा दोनच असल्यामुळे सेक्टर 1 ते 13 मधील सर्वांचे नावे भाग क्र 232 ते 241 व 272 ते 286 यामध्ये समाविष्ट आहेत.
तक्रारी गंभीर असून या संदर्भात योग्य तो मार्ग काढून योग्य मार्गदर्शन तथा आदेश महापालिकेस त्वरित द्यावेत. तसेच मतदार यादी अंतिम करण्यासाठी 21 जुलै 2022 पर्यंत मुदत दिली होती. त्यामध्ये आणखी 2 आठवड्याची मुदत वाढवून मिळावी. पावसाळा असल्याने निवडणूक घेण्याची कोणतीही घाई नसून भरपूर वेळ आहे. याद्या नियमनुसार निष्पक्ष व्यवस्थित होणे गरजेचे आहे. कोणत्याही मतदारवरही आणि कोणत्याही उमेदवारावर अन्याय होऊ नये. याची काळजी दक्षता घेणे प्रशासनाचे काम आहे, असे विलास मडिगेरी यांनी नमूद केले आहे.

























Join Our Whatsapp Group