पिंपरी (Pclive7.com):- कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना सक्तवसूली संचालनालय अर्थात ईडीने चौकशीसाठी समन्स दिले आहे.त्यामुळे संतप्त झालेल्या कॉंग्रेसने आज देशभर तीव्र आंदोलन केले. पिंपरी-चिंचवड कॉंग्रेसने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ते करीत केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तीव्र निषेध केला. यावेळी केंद्रातील भाजप सरकार व मोदी यांच्या विरुद्ध जोरदार घोषणा देण्यात आल्या.
महागाई आणि बेरोजगारीविरोधातील आवाज दाबण्यासाठी गांधी कुटुंबाची चौकशी हा कुटील डाव असल्याचे कॉंग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यावेळी सांगितले. भाजपच्या देश व्यापारीकरणाच्या आड गांधी कुटुंब येत असल्याने त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. भाजप व केंद्र सरकारकडून ईडीचा गैरवापर सुरु असून ते कॉंग्रेस व गांधी कुटुंबियांवर सूड उगवत आहेत, असे ते म्हणाले, ज्या डेक्कन हेरॉल्ड प्रकरणात हे समन्स सोनिया गांधी यांना बजावण्यात आले आहे ते खूप जुने असून त्यात चौकशी होऊन क्लीन चीटही मिळालेली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. गेल्या आठ वर्षात हुकूमशाही पद्धतीने कारभार करणाऱ्या मोदी, शहाचा यातून देशाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा आऱोप त्यांनी केला.
यावेळी माजी महापौर कवीचंद भाट, ज्येष्ठ नेते अशोक मोरे, काँग्रेसचे युवक शहराध्यक्ष कौस्तुभ नवले, माजी नगरसेविका निर्मला कदम, शहर काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष माऊली मलशेट्टी, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगताप, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विठ्ठल शिंदे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू दहीतुले, के. हरिनारायण, उमेश खंदारे, बाबा बनसोडे, डॉ. मनीषा गरुड, स्वाती शिंदे, नंदा तुळसे, दीपाली भालेकर, छायावती देसले, वैशाली दमावानी, रिटा फर्नांडिस, निर्मला खैरे, सीमा हलकट्टी, सुप्रिया पोहरे, प्रियांका मलशेट्टी, भारती घाग, वैशाली शिंदे, शितल सिकंदर, सुवर्णा कदम, राधिका अडागळे, शिल्पा गायकवाड,
आशा भोसले, शिवानी भाट, सरला जॉय, मंगला जोगदंड, नागेंद्र भंडारी, मीना रानडे, कुसुम वाघमारे, विमल खंडागळे, कांती देवी, काशीबाई पुलावळे, पुष्पा रेवरे, लक्ष्मी श्रींगारे, किरण नढे, सौरभ शिंदे, विजय ओव्हाळ, अनिता अधिकारी, सिस्टर साळवी, सुनिता जाधव, उमेश बनसोडे, हरीश डोळस, मोहसिन शाह, करण गिल, आण्णा कसबे, जुबेर खान, अर्जुन लांडगे, हिराचंद जाधव, किरण खाजेकर, नितीन खाजेकर, विशाल सरवदे, गौतम ओव्हाळ, सतीश भोसले, दिनकर भालेकर, मिलिंद फडतरे, आकाश शिंदे, राहुल ओव्हाळ, जेवियर ऍंथोनी, आबा खराडे आदी या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांनी मोदी हमसे डरता है, ईडी को आगे करता है आणि सोनिया तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है अशा जोरदार घोषणा दिल्या.