पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर मधील स्तुती चित्तोरा हिने ‘सी.ए.’ परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. या परिक्षेत तिचा देशात ३६ वा, तर महाराष्ट्रात दुसरा क्रमांक मिळवला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे व नगरसेविका शितलताई काटे यांनी स्तुती हिच्या घरी जाऊन भेट घेत शुभेच्छा दिल्या.

रहाटणी पिंपळे सौदागर प्रभागातील चित्तोरा कुटुंबातील श्री.अरविंद चित्तोरा यांची कन्या कु.स्तुती चित्तोरा हिने पहिल्याच प्रयत्नात CA इंटर परीक्षेत (IPCC) दोन्ही गटात अखिल भारतीय रँक 36 आणि महाराष्ट्रात दुसऱ्या नंबरची रँक मिळवली आहे.

स्तुती हिने मिळवलेल्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून तिचे कौतुक होत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल ऊर्फ नाना काटे व नगरसेविका सौ.शितलताई नाना काटे यांनी कु. स्तुती चित्तोरा हिचे अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी कु. स्तुती चित्तोरा हिचे आई-वडील सौ.वंदना चित्तोरा व श्री.अरविंद चित्तोरा उपस्थित होते.
Tags: देशात ३६ वा क्रमांकनगरसेवकनगरसेविकानाना काटेपिंपरी चिंचवड महापालिकापिंपळे सौदागरमहाराष्ट्रात दुसरा क्रमांकमाजी विरोधी पक्षनेताशितल काटेसी.ए. परिक्षासी.ए. परीक्षेत घवघवीत यशस्तुती चित्तोरा























Join Our Whatsapp Group