पिंपरी (Pclive7.com):- रावेत येथील जलउपसा केंद्रातील पाईप लाईनमधून होणारी पाणी गळती आणि दुरूस्तीचे काम शनिवार (दि.०६) रोजी करण्यात येणार आहे. त्यामुळे भोसरी आणि चिंचवड मधील विविध भागात दुपारी आणि संध्याकाळचा पाणी पुरवठा होणार नसल्याची माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.

महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून याबाबत निवेदन प्रसिध्दीस देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे रावेत येथे अशुध्द जलउपसा केंद्र आहे. या ठिकाणी भोसरी पाईप लाईन आणि चिंचवड पाईप लाईन यावरती मोठ्या प्रमाणात गळती होत असून दुरुस्तीचे काम तातडीने करणे अत्यावश्यक आहे. सदरची गळती थांबविणेसाठी शनिवार दिनांक ०६/०८/२०२२ रोजी भोसरी, भोसरी गावठाण, इंद्रायणीनगर, बो-हाडेवाडी, मोशी, च-होली, डुडळगाव, दिघी, संत तुकाराम नगर, मॅगझीन परिसर, बोपखेल, प्रेमलोक पार्क, चिंचवडगाव, पवना नगर, रस्टन कॉलनी, सुदर्शन नगर, प्रा. रामकृष्ण मोरे परिसर, पिंपरीगाव, पिंपरी नगर, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, दापोडी, जुनी सांगवी, नवी सांगवी, नेहरूनगर, वल्लभनगर, कासारवाडीचा रेल्वेगेट वरील परिसर, प्राधिकरण से.क्र. २३ आणि २६, सिध्दीविनायक नगरी, वाहतूकनगरी इ. भागाचा दुपारी/संध्याकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. तसेच दुसऱ्या दिवशी रविवार दिनांक ०७/०८/२०२२ रोजी सकाळच्या वेळापत्रकानुसार होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.
तरी नागरिकांनी महापालिकेकडील उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करून काटकसरीने पाणी वापरावे असे आवाहन पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.





















Join Our Whatsapp Group