पिंपरी (Pclive7.com):- कायदा व सुव्यवस्था सांभाळल्याने देश बलशाली होतो. राष्ट्रीय एकात्मता वाढवण्यासाठी आणि देश समृद्ध करण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन निगड़ी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विजयकुमार धुमाळ यांनी केले. आकुर्डी, दत्तवाडी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सव निमित्त आयोजित ध्वजारोहण धुमाळ यांचे हस्ते करण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी परिसरातील माजी सैनिक औदुंबर गुजर, प्रभाकर स्वामी, गोविंद राजेशिर्के, आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेती योगापटु धनश्री पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तर आकुर्डी येथील ९४ वर्षाचे वयोवृद्ध देशभक्त कान्हूजी रामजी फ़ापाळे यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. त्यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या देशभक्तीपर गीतांचा म्युझिकल बॅन्डमुळे वातावरण भारावून गेले होते.

यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक अण्णा कुऱ्हाडे, संपतराव शिंदे, वसंत सोनार, गंगाधर चौधरी, विश्वनाथ मोरे, गौतम बेंद्रे, अण्णा भोसले, चंद्रकांत इंगळे, रमेश बनसोड, बबनराव सुतार, गुगळे काका, फापाळे काका, जहांगीर पठाण, अरुण ओंबळे, सदाशिव कुंभार, दुर्योधन साबळे, प्रदीप धर्मे, हनुमंतराव चव्हाण, उद्योजक नितीन काकडे, जयसिंग पाटील, यशवंत भालेराव, शिवाजी मिसाळ, शिवाजी निंबरे, रूपेश जोशी, अलका कांबळे, वैदेही पटवर्धन, आशाताई मराठे, ललिता माने, दिशा कदम, सारिका पोटफोड़े, शिल्पा भालेराव, आशाताई शिंदे, मुमताज इनामदार, पुष्पाताई शेळके, सुभाष चव्हाण, अर्जुन गुरव, मजीद पटेल, संतोष चव्हाण, राजेंद्र साळवी, विलास सूर्यवंशी, रणजित बनसोडे, सुनीलकुमार पाटील, आझाद पठाण, योगेश पोटफोडे, माणिक चासकर, दत्ता बोऱ्हाडे, सातारा जिल्हा युवा मंचचे विकास शिंदे, यांचेसह अनेक आबालवृद्ध नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी कॉंग्रेस पिंपरी विधानसभेचे कार्याध्यक्ष इखलास सय्यद यांनी केले. तर शाहरुख शेख, सुनील मोरे, फैज शेख, शादाब शेख, आरबाझ शेख, जिब्राईल शेख, प्रशांत चव्हाणसर यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रकाश परदेशी यांनी केले तर रमेश भोरकर यांनी आभार मानले.
Tags: आकुर्डीइखलास सय्यदपिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसविजयकुमार धुमाळसहाय्यक पोलिस निरीक्षकस्वातंत्र्याचा अमृत महोत्सव






















Join Our Whatsapp Group