पिंपरी (Pclive7.com):- भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री.शांतीलालजी मुथा यांच्या वाढदिवसानिमित्त व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून भारतीय जैन संघटना पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने त्रिदिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये दिनांक 13 ऑगस्ट रोजी भारतीय जैन संघटना विद्यालय पिंपरी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिरामध्ये विद्यालयातील शिक्षक व पालक यांनी रक्तदान केले. दिनांक 14 ऑगस्ट 2022 रोजी तालेरा रुग्णालय चिंचवड येथे रुग्णांना व चाफेकर गुरुकुल चिंचवड मधील विद्यार्थ्यांना फळ वाटप व चिक्की वाटप करण्यात आले. तसेच दिनांक 15 ऑगस्ट 2022 रोजी स्वातंत्र्याच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय जैन संघटना विद्यालय पिंपरी येथे ध्वजवंदनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमासाठी लायन्स क्लब ऑफ पुणे आकुर्डीचे अध्यक्ष श्री. अनिलजी भांगडिया, श्री. प्रशिल ताथेड, सचिव बीजेएस पिंपरी चिंचवड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भारतीय जैन संघटना, पिंपरी चिंचवड विभाग तर्फे श्री.विरेश छाजेड अध्यक्ष बीजेएस पिंपरी चिंचवड, श्री संदेश गादिया, श्री शुभम कटारिया, श्री अतुल बोरा, तेजस कटारिया, बी.जे.एस.स्कूल.प्राचार्य श्री.देशमुख सर, मुख्याध्यापक श्री. जाधव सर, उप प्राचार्य श्री. कोकणे सर आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या वेळी श्री.अनिल भांगडिया यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये भारतीय जैन संघटनेच्या कार्याचे विशेष कौतुक केले. या कार्यक्रमाच्या वेळी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी सलामी परेड, देशभक्ती गीत, योगासन प्रात्यक्षिक, देशभक्तीपर नाटिका, समुहगान आदी कार्यक्रम सादर केले. या यावेळी प्रमुख पाहुण्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन विद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला.
ध्वजवंदनाच्या कार्यक्रम झाल्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. दि.13 ऑगस्ट 2022 रोजी झालेल्या फळ वाटप कार्यक्रम साठी योगदान श्री. हितेशजी सुराणा, निगडी यांचे तर्फे देण्यात आले. दि.15 ऑगस्ट 2022 रोजी मुलांना खाऊ वाटपसाठी श्री.अनिलजी भांगडिया, व प्रशीलजी ताथेड यांचे योगदान लाभले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.जाधव सर यांनी केले.